सन १९८४ मध्ये गांधी विद्यालय शिक्षण संस्था , कोंढा तह. पवनी जि. भंडारा अंतर्गत विरली बूज, तह. लाखांदूर येथे गांधी विद्यालयाची स्थापना करण्यात आली.
विरली बूज व परिसरातील शेतकरी व शेत मजुरांच्या मुलं मुलींना शारिरीक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक व नैतिक विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षणाची सोय करण्यात आली. तसेच समाजाला प्रगती पथावर नेण्याच्या ध्येय पुढे ठेवण्यात आले होते. त्या दृष्टीने विद्यालयात भौतिक सोय सुविधांनी युक्त अशी इमारतीची उभारणी करण्यात आली. या मध्ये सुसज्ज वैज्ञानिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, डिजिटल वर्गाकरिता प्रोजेक्टर ची व्यवस्था, क्रीडा साहित्याची पुरेशी व्यवस्था, शाळा व शाळा बाह्य परीक्षांचे आयोजन करणे, सुसज्ज वाचनालय तसेच परिसरातील विद्यार्थाना सेमी इंग्रजी माध्यमाचा शिक्षणाची सोय करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टीने कवायती करीता भव्य क्रीडांगण व साहित्याची उपलब्धता व शालेय बगीच्या मुळे नेसर्गिक वातावरणात भर पडली आहे.
अधिक वाचावेगळी विशाल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संगणक प्रयोगशाळा
वाचन कक्षामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिके उपलब्ध आहेत.
नैसर्गिक प्रकाश आणि ऑक्सिजन प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेंटिलेशनसह शाळेत विशाल वर्ग कक्ष आहे