मुख्याधापक संदेश

Principal Image

न १९८४ मध्ये गांधी विद्यालय शिक्षण संस्था , कोंढा तह. पवनी जि. भंडारा अंतर्गत विरली बूज, तह. लाखांदूर येथे गांधी विद्यालयाची स्थापना करण्यात आली.

विरली बूज व परिसरातील शेतकरी व शेत मजुरांच्या मुलं मुलींना शारिरीक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक व नैतिक विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षणाची सोय करण्यात आली. तसेच समाजाला प्रगती पथावर नेण्याच्या ध्येय पुढे ठेवण्यात आले होते. त्या दृष्टीने विद्यालयात भौतिक सोय सुविधांनी युक्त अशी इमारतीची उभारणी करण्यात आली. या मध्ये सुसज्ज वैज्ञानिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, डिजिटल वर्गाकरिता प्रोजेक्टर ची व्यवस्था, क्रीडा साहित्याची पुरेशी व्यवस्था, शाळा व शाळा बाह्य परीक्षांचे आयोजन करणे, सुसज्ज वाचनालय तसेच परिसरातील विद्यार्थाना सेमी इंग्रजी माध्यमाचा शिक्षणाची सोय करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टीने कवायती करीता भव्य क्रीडांगण व साहित्याची उपलब्धता व शालेय बगीच्या मुळे नेसर्गिक वातावरणात भर पडली आहे. सह शालेय उपक्रमा मध्ये गावाची स्वछता, गावातील लोकांच्या आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात.

विद्यार्थ्यांना तंबाखू व इतर व्यसन लागू नयेत यासाठी वर्गात महिन्यातून एकदा संबधीत व्यसनावरील घातक परिणामाची चलचित्रफित दाखवण्यात येते. त्याच बरोबर स्नेह-संमेलन व सहलीचे आयोजन करण्यात येते.

थोर समाजसुधारक व पुढारांच्या जयंत्या व पुण्यतिथीचे कार्यकर्मनिरन्तर राबविण्यात येतात.

आमचे ध्येय

  • वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक वातावरण खेड्यतच मिळतो त्यामुळे खऱ्या बुद्धीचा विकास हा खेड्यतच शक्य आहे .त्या मुळे शिक्षणाचा प्रवाह शहराकडून खेड्या कडे हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे

आमचं दृष्टीकोन

  • विदयार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक व नैतिक विकास करून सामाजीक व शेवटी देशाचा विकास साधणारी सक्षम पिढी निर्माण करणे होय.
मुख्याधापक
श्री. व्ही.डी.नंदनवार
s